बीड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परळी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मोफत फाॅर्म वाटपास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष साप्ताहिक मानपत्रचे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती असे की नुकतेच राज्य शासनाने महिलासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून प्रत्येक महिलांना प्रत्येक महिना दीड हजार रुपये महिना सुरू केला असून यामुळे महिलाही स्वावलंबी होईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना चालू केली असून याचाच एक भाग म्हणून परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मध्ये महिंलाची अडचण दूर व्हावी व आर्थिक बोजा पडू नये हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साप्ताहिक मानपत्र व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत फॉर्म वाटप करण्यात येत असून आज पर्यंत 566 फॉर्म वाटप करण्यात आले असून 200 फॉर्म जमा झाले आहेत या मोफत फॉर्म योजनेस वार्ड क्रमांक तीन व चार मधील नागरिक व महिला उत्तम प्रतिसाद देत असून यामुळे तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साप्ताहिक मानपत्र व वंचित बहुजन आघाडीने हा उपक्रम हाती घेतल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात येत आहेत..

