prabodhini news logo
Home ठळक बातम्या गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी कपडे काढणारा सरपंच पहिल्यांदाच पाहिला

गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी कपडे काढणारा सरपंच पहिल्यांदाच पाहिला

0
400

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – भारत हा लोकशाही प्रधान देश आहे निवडणुकीतून आपण प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, खासदार,आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य निवडून देतो. यांच्या माध्यमातूनच आपल्या स्थानिक भागाचा विकास होतो.परंतु काही सदस्यांना मर्यादा येत असल्याने त्यांचा गावाचा विकास करण्यासाठी अडचण येत असेल प्रशासकीय अधिकारी यांची दखल घेत नसेल तर अशावेळी खरा लोकसेवक आपल्या भागातील विकास करण्यासाठी धडपड करत असतो तोच खरा राजकारणी

भारतीय लोकशाहीमध्ये गावाचा सरपंच हा तळागाळातील लोकसेवक असतो.
आपल्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा जीर्ण झाल्याने त्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने त्यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्या झळकत आहे. आपल्या गावाची अब्रू जात असल्याने आपली स्वतःची अब्रू धावणीला बांधून शाळेच्या दुरुस्तीसाठी स्वतःचे कपडे काढून अर्ध नग्न आंदोलन करण्यासाठी खांडबारा गावातील ग्रामपंचायत सरपंच अविनाश गावित हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत आहे. हे खरंच दुर्दैव म्हणावा लागेल

सरपंचांना गावातील शाळा दुरूस्तीसाठी कपडे काढावे लागत आहे. राजकारणात आल्यानंतर पुढारी महागडे कपडे घालतात महागड्या गाड्या वापरतात परंतु आपल्या गावातील लेकरांचा शिक्षणासाठी उत्तम सोय व्हावी म्हणून पहिल्यांदाच सरपंच कपडे काढताना पाहिला. सरपंच अविनाश गावित खरंच आपलं पाऊल गावाचा हितासाठी पुढे आहे आपणास शुभेच्छा आपली व खांडबारा ग्रामस्थांची लढाईला यश मिळो..!

ही चमचेगिरी नाही वास्तव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here