नागरिकांनी स्वनिधीतून पैसे खर्च करून स्वतः केला रस्ता

0
170

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज पुणे – पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 मध्ये 23 गाव समाविष्ट झाली परंतु सच्चाई माता परिसर आंबेगाव खुर्द येथे सुविधाचा अभाव आहे. विमलाबाई धडे यांचा या ठिकाणी रस्ता नसल्या कारणास्तव पाय मुरगळून पडल्या होत्या बरेच दिवस आजारात काढल्यानंतर त्यांचा 17 डिसेंबर 2023 रोजी मृत्यू झाला त्यावेळेस सुद्धा ॲम्बुलन्स ने आन करण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. ही दुर्दैवी घटना अनेक प्रसार माध्यमातून वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, परंतु बातमी प्रसिद्ध होऊन सुद्धा शासन आमदार खासदार जागे झाले नाही. नागरिकांनी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाला आमदार खासदारांना सर्वांना निवेदन देऊन सुद्धा आज पर्यंत रस्ता झाला नाही. आत्ताच्या पावसाळ्यात बिकट परिस्थिती रस्त्यांची उद्भवली होती. नागरिकांना ये जा करण्यासाठी पर्याय रस्ता उरला नाही. पावसाळी दिवसांमध्ये अनेक लोक तिथले आजारी पडले होते. दवाखान्यात वृद्धांना जाणेने कठीण झाले होते. शाळेत मुलांला ये जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे नागरिकांनी स्वखर्चातून निधी गोळा करून नाईलाजाने स्वतः रस्ता केला यामध्ये स्वतः नागरिक 30 ते 40 जण रस्ता करण्यासाठी सहभाग घेतला. आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनु. जाती प्रशांत कांबळे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्स देत असतात. नागरिक जर सर्व खर्च उचलत असतील तर शासन प्रशासनाचा काय उपयोग नागरिकांना सुविधा देण्यास ह्या मध्ये प्रशासन स्थानिक आमदार खासदार फेल ठरलेले आहेत. सहभाग स्थानिक नागरिक श्रीराम शेंबडे, सारिका केकन पांडुरंग चोपडे, बालाजी बिराजदार, लक्ष्मण केकान, दिपाली शेंबडे, जयश्री पोळेकर,जीवन कोळेकर, धनाजी पोकळे, शहाजी भोसले, अवसरे, शेंडकर, माऊली कांबळे, पवन दोरखडे, आदित्य आबनावे, पाटील, गोविंद सिंग, सुखदेव कचरे, गायकवाड, उदय नगरकर, प्रकाश कुंभार, विशाल ताठे,महादेव कापरे इतर नागरिक उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here