
उषा नाईक वाशिम जिल्हा संपादक वाशीम -राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे द्वारे आयोजित शिक्षण सप्ताह अंतर्गत येथे, यावर्डीच्या बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक २२ जुलैला विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमा अंतर्गत पहिल्या दिवशी ‘अध्ययन-अध्यापन साहित्य’ या कार्य शाळेत माध्यमिक गटातून वर्ग 8,9 व 10 वीच्या 67 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात त्यांनी गणितीय कोड़ी, कार्ड्स,तक्ते,कागदा पासून खेळने इत्यादी विषयावर आधारित कलाकृती बनविल्या. तसेच विद्यार्थ्यांनी रद्दी कागदा पासून विविध खेळनि, कलाकृती तयार करून स्वनिर्मिताचा आनंद मिळवला. विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे भरभरून कौतूक केले. राजेश शेंडेकर, गोपाल काकड,अनिल हजारे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते.














