आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चीन सारख्या अतिप्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न असलेल्या देशात एम. बी. बी. एस. या वैद्यकीय शिक्षणाची सहा वर्षाची पदवी घेऊन भाग्येश आनंद तागवान आरमोरी जिल्हा गडचिरोली हा नुकताच भारतात परतला. पदवीदान समारंभ हा चीनमधील हाँगजो येथील झिझीयांग युनिव्हर्सिटी मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या समारंभाला युनिव्हर्सिटीचे डीन डाँग मीन हुआँ लाओशी, इतर सहकारी व वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी हजर होते.
भाग्येश तागवान याने नुकतीच झालेली राष्ट्रीय पातळीवरील एफ. एम. जी. ई. ही परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय गुरूजन व आई-वडिलांना दिले आहे. सचिन बोरकर,सुनिल उके,यांनी अभिनंदन केले असून या यशाबद्दल परिसरात सर्वच स्तरावरून त्यांचेवर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

