बोर्डा बोरकर ते बोर्डा झूल्लूरवार मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूलाकाठाला पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करा- आशिष नैताम

0
137

किरण मेश्राम तालुका प्रतिनिधी, पोंभूर्णा:- सर्वत्र पावसाने कहर केला असून पुरामुळे अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत अशातच मौजा बोर्डा बोरकर ते बोर्डा झूल्लुरवार मार्गावर असलेल्या नाल्यावरील पूलाच्या कडेला मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या मार्गाणी वाहतूक करणे अवघड झाले असून बससेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या मार्गावरून पायदळ चालणे देखील कठीण झाले असून शेतकरी शेतमजूरांना शेतीकामासाठी ये जा करणे धोक्याचे झाले आहे आणि या मार्गावरून मार्गक्रमण करतांना जीवीतहानी सूद्धा नाकारता येत नाही करीता आपण या समस्येची गांभीर्यपूर्ण दखल घेऊन सदर मार्ग सुरळीत करावा आठ दिवसाचे आत मागणी पूर्ण न झाल्यास पोंभूर्णा मनसे कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी संबधीत विभाग जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाअध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार, मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) यांच्या मार्गदर्शनात मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम यांच्या उपस्थीतीत उपअभियंता सार्वजणीक बांधकाम विभाग पोंभूर्णा यांना देण्यात आले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे तालुका उपाध्यक्ष रोशन भडके, शहराध्यक्ष निखील कन्नाके, मनविसे तालूका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनविसे तालुका सचिव आशिष आर. नैताम, मनविसे शहराध्यक्ष पवन बंकावार, हेमंत उराडे, प्रमोद ढाक, महेश नैताम आदी मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here