नामदेव शेंडे यांची शाळा व्यवस्थापन सामिती वाघनख अध्यक्षपदी निवड

0
99

वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वरोरा पंचायत सामिती अंतर्गत जि.प.उ.प्रा.शाळा वाघनख च्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली त्यामध्ये नामदेव शेंडे यांची अध्यक्ष तर शिवानी जगताप यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.पंधरा सदस्यीय कमेटीत सदस्य प्रिया नगराळे,प्रविण गाऊत्रे,गीता वांदिले,रवींद्र मडकाम, वंदना फोपारे,बाबाराव जेंगटे,रेखा उरकुडे,प्रवीण ढोले, शिक्षक प्रतिनिधी नरहरी बनसोड,विदयार्थी प्रतिनिधी युवराज नागोसे, कु.आदिश्री भोयर, तर सचिव म्हणून पदशिद्ध मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. पालक सभेचे नियोजन मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी तर सभेचे सूत्रसंचालन विषय शिक्षक नरहरी बन्सोड यांनी केले नवनिर्वाचित समितीच्या स्वागतपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स. शिक्षिका रेखा थुटे, वैशाली गायकवाड यांनी पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here