prabodhini news logo
Home चंद्रपूर भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूरच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य...

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूरच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांना बेबी किट वाटप

0
183

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज- चंद्रपूर : समाजकार्यातुन तरुण युवा पिढीला चांगल्या प्रकारे योग्य मार्गावर नेऊन आणि समाजातील समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द होण्यास प्रेरित करणारे..
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याचा, जनतेच्या हक्काच्या माणसाचा, सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस 30 जुलै रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला.
आदरणीय भाऊंचा वाढदिवस आरोग्य पंधरवडा म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे..
त्याकरिता शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, सोबतच अनेक उपक्रम घेण्यात आले…

अश्यातच भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर च्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 हून अधिक नवजात बालकांना बेबी किट वितरण करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष ब्रिजभूषन पाझारे , कुशल युवा संघटक भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, युवा मोर्चा युवती प्रमुख मुग्धा तरुण खांडे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून सर्व माता भगिनींना आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी गणेश रामगुंडेवार महामंत्री भाजयुमो,यश बांगडे, अमोल खैरे, सागर गटलेवार, यश ठाकरे,तृष्णा गेडाम, जयश्री आत्राम, शुभांगी थुल सह अनेक भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण युवा मोर्चा च्या वतीने भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष विशाल भाऊ निंबाळकर, ब्रिजभूषन पाझारे, मुग्धा खांडे यांनी आदरणीय लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here