जगदीश वडजे जिल्हा प्रतिनिधी, नाशिक – म.वि.प्र.समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा विद्यालयात शोषितांचा बुलंद आवाज,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून मुंबई मराठी माणसाची कशी आहे हे ठणकावून सांगणारे लोकशाहीर आण्णा साठे जयंती व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक जहालमतवादी प्रखर व्यक्तीमत्व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त यांच्या प्रतिमेचे संयुक्तपणे पूजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.सुनील पाटील सर,जगदीश वडजे,कांता देव,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले
अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती इयत्ता ९ वी क मधील आदित्य गांगुर्डे राधिका दिघे,धनश्री जमदडे आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितली.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संजीव पठाडे यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि त्या इतिहासातील टिळकांचे स्थान यांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपक्रमशील पर्यवेक्षक सुनील पाटील सर यांनी अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला मिळालेले एक वरदान होतं त्यांच्या लावण्या लोकगीते कादंबऱ्या या नक्कीच संजीवनी देणाऱ्या होत्या म्हणूनच संयुक्त महाराष्ट्रlच्या लढ्यामध्ये त्यांच्या याच कविता कादंबऱ्या यांनी लोक जागृती केली म्हणून त्यांचं स्मरण करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असे आपल्या मनोगत असून सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी तसेच मार्गदर्शन निता सोनवणे यांनी सुंदर रित्या केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती गुंड, ऋषिका पुरकर यांनी संयुक्तपणे केले. तर आभार समृद्धी गाढवे हिने मानले.

