शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपुर :- गरीब आणि निराधारांना आर्थिक भारातून मुक्त होण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेचे कुटुंब आणि पिवळे व केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येत असून जुलै महिण्यातील धान्य मशीन बंद असल्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात 30 ते 40 टक्केच वाटप झाल्याने माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिण्याचे धान्य एकत्र वितरित करण्यास तात्काळ संबंधितांना आदेश देण्यासंदर्भात शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना म्हणजे अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब आणि पिवळे व केसरी रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब लाभार्थीयांना त्यांच्या पात्रतेनुसार दरमहा अन्नधान्य वितरित करीत असून 1 जानेवारी 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच अंत्योदय कुटुंबांसाठी 35 किलो अन्नधान्य आणि पिवळे व केसरी कार्ड धारकांना प्रति व्यक्ती प्रति व्यक्ती 5 किलो धान्य पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी मोफत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे नियमित धान्य पुरवठा करणे आवश्यक असताना माहे जुलै 2024 महिण्यातील धान्य मशीन बंद असल्यामुळे प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी वंचित राहु नये, याकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन कार्ड धारकांना माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिण्याचे धान्य एकत्र वितरित करण्यात येण्यासंदर्भात तात्काळ संबंधितांना आदेश देण्याची मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी केली असता यावेळी वाहतुक जिल्हाध्यक्ष तथा वैद्यकीय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, कोरपना तालुका प्रमुख राकेश राठोड, चंद्रपुर उपतालुका प्रमुख गुरुदास मेश्राम, गडचांदूर विक्की राठोड उपस्थित होते.

