नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – साहित्य दर्पण कला मंच नागपूर या समूहाने दिनांक ३१ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित कवितेतून स्वपरिचय या उपक्रम विषयावर कवी कवयित्री यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जवळपास १९० कवी कवयित्री यांनी आपल्या रचना सादर केल्या आणि महाराष्ट्र राज्यात हा समुह अल्पावधीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.
यासाठी समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर, प्रा. नानाजी रामटेके समुह संस्थापक, साहित्य दर्पण कला मंच नागपूर यांनी सर्व कवी कवयित्री यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या.
साहित्य दर्पण कला मंच नागपूर या समूहाची स्थापना दोन वर्षापूर्वी झाली असून एवढ्या कमी दिवसात या समूहाने राज्यात सर्वाधिक रचना येत असल्याची विक्रमी नोंद केली आहे.
नवोदित कवी कवयित्री यांना या समूहाच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
यासाठी आपला साहित्य समूह राज्यात पहिल्या क्रमांकावर कसा येईल यासाठी समूहाला अधिक वेळ देवून आलेल्या रचनांना अगदी अभ्यासपूर्ण आणि अनुभवपूर्ण शब्दात अभिप्राय देत असल्याने समूहात अनेक कवी कवयित्री सामील झाले असून आज समूहात ६१० सदस्य असल्याचे समूह संस्थापक प्रा. नानाजी रामटेके यांनी सांगितले आहे.


👍🏻👍🏻👍🏻💐❤️पावसाची कविता पाठवी कां?