सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीचा उपक्रम
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालक सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही च्या वतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निसर्गाची संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वृक्षदिंडी सर्वोदय कन्या विद्यालय पासून मदनापुर वार्ड, आंबेडकर चौक, खाती मोहल्ला, भारत माता चौक, राम मंदिर, बाजार चौक या मार्गाने निघाली. दिंडीचे विसर्जन सर्वोदय कन्या विद्यालय येथे करण्यात आले. झाडे लावा दारोदारी, समृध्दी येई घरोघरी, झाडे लावा जीवन वाचवा, एक मुल एक झाड इ. घोषवाक्य देत दिंडी काढण्यात आली. वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलींनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. मुलींचे वेगवेगळ्या रंगांचे वेशभूषा सर्वांचे आकर्षण केंद्र ठरले होते. वृक्षदिंडीचा समारोप झाल्यानंतर सर्वोदय कन्या विद्यालय व पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे वृक्षारोपण करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

