रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडोंगरी नजीक असलेल्या तलावाची पाळ फुटल्याने त्यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थेने टाकलेली मत्स्य बिजाई पुर्णपणे वाहुन गेल्याने मच्छीमार संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याऱ्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
मागील जूलै महीन्याच्या उत्तराधार्त ब्रम्हपूरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. तर तालुक्यातील बरेचसे तलाव देखील पुर्णतः तुडुंब भरले होते. अशातच ब्रम्हपूरी तालुक्यातील मालडोंगरी नजीक असलेला तलाव देखील पुर्णपणे भरला होता. या तलावात चौगान मच्छीमार सहकारी संस्थेने मत्स्य व्यवसाय करण्याकरिता मत्स्य बिजाई टाकली होती. मात्र अचानक तलावाची पाळ फुटल्याने या तलावातील संपूर्ण मत्स्य बिजाई वाहुन गेली होती. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याऱ्या संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे मत्स्य व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते. याबाबत मच्छीमार सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेत झालेल्या नुकसानीबाबत व ओढवलेल्या संकटाबाबत माहिती दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मत्स्य व्यवसाय करण्याऱ्या बांधवांच्या पाठीशी आपण सदैव असल्याचे सांगत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ आपल्या स्वतःकडुन सदर मत्स्य व्यावसायिकांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
सदरची आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

