शारदा भुयार वाशीम महिला जिल्हा प्रतिनिधी कारंजा : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून, तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागामार्फत वयोवृद्ध, विधवा,दिव्यांगांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिल्या जाते. यापुढे हे अनुदान डीबीटी (थेट हस्तांतरण ) पद्धतीने दिले जाणार असल्यामुळे निराधार, वयोवृद्ध,विधवा,दिव्यांगाना आपले आधारकार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले असून बँक खात्याशी सुद्धा लिंक करून अपडेट झालेल्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात आणून देण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी सांगीतले आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निराधार योजनेच्या ज्या लाभार्थ्यानी अद्यापपर्यंत आपले आधारकार्ड आधार केन्द्रावर जाऊन अपडेट केले नसेल त्यांनी पंचायत समिती कारंजा किंवा मुल्जिजेठा म्युनिसिपल हायस्कूल येथे सुरु असलेल्या आधारकेन्द्रावर जाऊन आपआपले आधार कार्ड मोबाईल नंबर सह अपडेट करून घ्यावे. व नंतर अपडेट केलेल्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या विभागात आणून द्यावे. तसेच सदरहू अपडेट केलेले आधारकार्ड आपल्या बँक खात्याला सुद्धा जोडून घ्यावे.अन्यथा निराधाराचे अनुदान बंद केले जाईल. व त्याची जबाबदारी कर्तव्यात कसूर करणाऱ्या निराधार लाभार्थ्यावर राहील.

