शारदा भुयार वाशीम महिला जिल्हा प्रतिनिधी वाशिम : सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचे कडून, राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेच्या सर्व मानधन लाभार्थी कलाकारांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून,त्यांना आपआपल्या बँक खात्यांची ई-केवायसी करण्यासारखे कळविण्यात आले आहे. उल्लेखनिय म्हणजे लाभार्थी कलावंतानी यापूर्वी दिलेल्या बँक खात्यात मे 2024 पासून मानधन मिळत नसून, शक्यतोवर त्यापूर्वी आधार कार्ड लिंक असलेल्या अगोदरच्या राष्ट्रिय बँकेत आधारकार्डवर डी बी टी (थेट हस्तांतरण) द्वारे मानधन पाठविण्यात येत आहे. त्यामुळे राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेच्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपआपल्या बँकेत जाऊन ई-केवायसी करून घ्यावी.अन्यथा पुढील महिन्याचे मानधन रोखल्या जाऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी अविलंब ई केवायसी करून घ्यावी . असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.

