जिल्हा काॅंग्रेसचे सचिव विलास विखार यांनीही दिली आर्थिक मदत
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
ब्रम्हपूरी शहरातील बोंडेगाव वार्ड येथे प्रज्ञा राजकुमार मेश्राम ही युवती राहते. सदर युवती ही अनाथ असुन काही वर्षापुर्वी तिचे आईवडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हा पासून ती आपल्या आत्यासह दोघीच जणी राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला शिक्षण घेतांना अनेक अडथळे निर्माण होत होते. तरी सुद्धा या युवतीने ब्रम्हपूरी येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र तिला भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनायचे असल्याने ती पदवीच्या प्रथम वर्षांपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आता पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती दिल्ली येथे जाणार आहे. मात्र दिल्ली येथील स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देणाऱ्या एका संस्थेची शुल्क भरण्यासाठी तिच्या कडे पैसे नव्हते. मात्र तिने ऐकले होते की ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे नेहमीच प्रत्येक गरजुंच्या मदतीला धावून जात असतात. व त्यांच्या कडे आपली समस्या घेऊन गेलेला माणुस कधीच निराश होऊन परतत नाही. म्हणून ती आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपूरी येथील निवासस्थानी आली व त्यांना भेटुन स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीकरीता तिला येत असलेल्या अडचणीबाबत माहीती दिली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सदर युवतीला दिल्ली येथील संस्थेत शुल्क भरण्यासाठी लागणार असलेली सर्व आर्थिक मदत तात्काळ त्या युवतीला दिली. यावेळी न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार यांनी देखील तिला आर्थिक मदत दिली. युवतीने देखील आमदार विजय वडेट्टीवार व न.प. माजी बांधकाम सभापती विलास विखार यांचे आभार मानत हसऱ्या चेहऱ्याने प्रशासकीय अधिकारी बनून ब्रम्हपुरीचे नाव उंचावणार असे सांगितले.

