परळी शहरातील बौद्ध धर्मीयांच्या धम्म केंद्राच्या बांधकामासाठी 15 ऑगस्ट पासून परळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषन – बालासाहेब जगतकर.

0
53

परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परळी शहरातील बौद्ध धर्मीयांच्या धम्म केंद्राच्या बांधकामासाठी 15 ऑगस्ट पासून परळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी नगरपालिकेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2019 ला मोठा गाजावाजा करून परळी शहरातील बौद्ध धर्मीयांचे मतदान घेण्यासाठी शहरातील भीम नगर येथे भव्य असे बौद्ध धम्म केंद्राची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा करून या घोषणेस आज जवळपास पाच वर्षे होऊन गेले असून या कामासाठी साधा प्रस्तावही शासन दरबारी नाही किंवा एक दमडीही अर्थसंकल्पात मंजूर करून घेतलेली नाही तसेच भीम नगर येथील अनेक कामे हे कागदावरच झाली असून दलित वस्तीची कामे ही दुसऱ्या वस्तीमध्ये वळवण्यात आलेली आहे तसेच दलितांची स्मशानभूमी असेल दलितांचे महिलांचे सार्वजनिक स्वच्छालय असेल दलितांची लाईट शंकर साळवे ते सखाराम जगतकर यांच्या घरापर्यंत पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा रस्ते नाल्या ह्या गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेले असून त्यामुळे सदरील भागात दुर्गंधी पसरली आहे ते लवकरात लवकर करण्यात यावेत असे अनेक वेळा लेखी व प्रत्यक्षात भेटून संबंधित्यांना निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारचे कामे न झाल्याच्या निषेधार्थ येणाऱ्या दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी परळी शहरातील बौद्ध धम्म केंद्राची बांधकाम करण्यात यावे. दलितांच्या स्मशान भूमीतील लाईट पाणी रोड ची व्यवस्था करून साफसफाई करण्यात यावी. महिलांच्या सार्वजनिक संडास मध्ये लाईट पाणी ची व्यवस्था करण्यात यावी अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेच्या विविध कामाची चौकशी करण्यात यावी . शंकर साळवे ते सखाराम जगतकर यांच्या घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा या व विविध विषयासाठी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर हे परळी नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे तरी सर्व बौद्ध बांधवांनी या उपोषणास सहकार्य करावे व बौद्ध धम्म केंद्राच्या बांधकामास चालना मिळेल याची दक्षता घ्यावी असेही आवाहन बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here