परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नारीशक्ती दूत हेच ॲप चालू करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्य सरकारने नुकतीच महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली खरी पण या योजनेसाठी नवीन चालू केलेली ऑनलाइन सेवा ही महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. कारण ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी नवीन चालू केलेले सर्वर म्हणजे साईड ओपन होत नाही. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु अगोदर चालू केलेली नारीशक्ती दूत हे ॲप उत्कृष्ट असून यामुळे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना तर फॉर्म भरताच येईल .पण घरच्या घरी ही महिलांना आपापले फॉर्म भरता येत आहेत. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नारीशक्ती दूत हेच ॲप चालू करून महिंलाची हेळसांड थांबवून त्यांच्या खात्यावर ताबडतोब अनुदान येईल अशी ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे.

