प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर शहरात पून्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून कुख्यात गुंड शेख हाजी सरवर याची भर दिवसा बिनबा गेट परिसरात गोळी झाडून अज्ञात आरोपींनी हत्या केली आहे. या घटनेने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला असून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी झाले असून सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस नेते राजू झोडे यांनी केली आहे.
जिल्ह्यात गोळीबाराच्या घटना लागोपाठ घडत आहेत.तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या करण्यात व्यस्त असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न मुनगंटीवार यांच्याकडून केले जात आहे.एकाही गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ न देता पोलिसांच्या बदल्या केल्या जात असून गुन्हेगारी आणखी वाढत चालली आहे. त्यामुळं गुन्हेगारी रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.

