प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे स्थापन करत असलेला नियोजित राष्ट्रीय जनहित पार्टी या पक्षातर्फे चंद्रपूर विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 13 / 08 / 2024 रोजी शासकीय विश्रागृह चंद्रपूर येथे घेण्यात आल्या.
संजय पांडे यांचे खंदे समर्थक असलेले पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली या मुलाखती घेण्यात आल्या.
सदर मुलाखत देण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती , यामधे वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक ,ग्रामीण भागातील विविध पक्षातील पदाधिकारी,तसेच विविध संघटनांचे अध्यक्ष यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
या बैठकीला चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त { PI } ए.एल. काटकर,जिल्हा उपाध्यक्ष सेवानिवृत्त भडके { Psi } गंगाधर पिदुरकर, सेवानिवृत्त { PI } सेवानिवृत्त { ASI } सोनकर, सेवानिवृत्त { ASI } वाघमारे,(api) खोब्रागडे त्याच प्रमाणे चालक संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भास्कर वाढई,भैय्याजी मानकर ,वंचित बहुजन आघाडीचे विष्णू चापडे, आशा राजभर, मोहन आत्तेकर , दिलीप उरकूदे, सचिन बुरडकर, सचिन दानव, देविदास बोबडे, विशाल अमूतकर,बशीरभाई अन्सारी, सद्दाम अन्सारी, किरण घाटे, अनिल वैद, मनोज मेंढे, रवी घंटलवार, प्रवीण भुजाडे, केशव किन्नके, अक्षय धानोरकर, अक्षय भिवंगडे, रवी सहस्त्रेबुध्दे,कविता तिमा, सविता खुटेमाटे, अनिता बोनगिरवार, सगीता कुडावले, सुनिता बावणे, ज्योती राऊत, सोनल साकरकर, माया पाझनकर, अनिता पेन्दाम, सुवर्णा खोब्रागडे, समीनदारा बोरकर, अनिता chavdari, सुनीता बरसागडे, सूर्यकांता जुमनाके, अर्चना ठाकरे,नेहा सारसर,यांची उपस्थिती होती.

