प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर- ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर चंद्रपूर येथे भारत देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्य मा.मुरलीधर गोहणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.देवराव कोंडेकर गुणवंत कामगार तथा जिल्हाध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, प्रमुख अतिथी मा.मुरलीधर गोहणे गुरुदेव सेवक तथा अध्यक्ष तुकारामदादा गीताचार्य प्रतिष्ठाण नागपूर, मा.धर्मेंद्र कनाके गुणवंत कामगार तथा कवी, मा.विठ्ठल देठे जेष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती.मा.मुरलीधर गोहणे व धर्मेंद्र कनाके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्य आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. देवराव कोंडेकर यांनी मंडळाच्या विविध योजना बद्दल उपस्थितांना माहिती देऊन स्वातंत्रदिनानिमित्य शुभेच्छा दिल्या. यावेळी बालगोपालांना लाडू,चॉकलेट खाऊचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहना खोब्रागडे मॅडम कामगार कल्याण केंद्राचे प्रभारी केंद्र संचालिका यांनी केले तर आभार सुवर्णा उपरे यांनी मानले.या कार्यक्रमाला शिशुमंदिरचे विद्यार्थी,पालक तसेच जेष्ठ नागरिक व ऊर्जानगर वासीयांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेकरीता केंद्राचे कर्मचारी मोहना खोब्रागडे ,कविता सदाफळे,सुवर्णा उपरे यांनी सहकार्य केले.

