बल्लारपूर बामणी ते येनबोडी महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ दुरस्त करा- मनसे महिला सेना कल्पणा पोतर्लावार

0
98

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बल्लारपूर:- सर्वत्र पाऊसाने कहर केला असून या सततच्या मुसळधार पाऊसामुळे रस्ते जलमय झाले त्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत अशातच बल्लारपूर बामणी ते येनबोडी या राष्ट्रीय महामार्गावर पाऊसामुळे सर्वत्र खड्डे पडले असून या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची वर्दळ जास्त प्रमाणात असल्याने वाहतुक करणे अवघड झाले असुन जीवीतहानी नाकारता येत नाही काहि विपरीत घडून जीवीतहानी होण्याआधीच या राष्ट्रीय मार्गावरील खड्डे त्वरीत दुरस्त करा अशी मागणी कल्पणा पोतर्लावार मनसे महिलासेना बल्लारपूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना निवेंदन देण्यात आले या निवेंदन प्रमुख मार्गदर्शन किशोर मडगुलवार जिल्हा सचिव व कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष असून सदर मागणी आठदिवसाचे आत पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोर्टलावार,प्रविन दासरफ मनविसे शहर अध्यक्ष स्वप्न ब्राह्मणे राकेश आमटे तथा मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here