अरविंद केजरीवाल यांचे विचार प्रत्येक घरा घरात पोहचवणार – वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा.
भद्रावती प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क- भद्रावती-दिनांक 16 ऑगस्ट 2024 आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली चे लाडके मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल यांचा 56 व्या वाढदिवसा निमित्त वरोरा – भद्रावती विधनसभा प्रमुख सुरज भाऊ शहा यांच्या नेतृत्वात गजानन मतिमंद विद्यालय भद्रावती येथे मुलांन सोबत साजरा करण्यात आला. सर्वप्रथम लहान मुलांच्या हातांनी केक कापण्यात आले. त्या नंतर मुलांच्या तब्येती बद्दल विचारणा करण्यात आले. दिल्ली मधे ज्या प्रमाणे केजरीवाल सरकार द्वारा केलेल्या कामा बद्दल माहिती देण्यात आली व त्यांना सांगण्यात आले की, केजरीवाल साहेबांनी गरिबांना मुफ्त दर्जेदार शिक्षण, दर्जेदार सरकारी दवाखाने, मुफ्त वीज, मुफ्त पाणी, महिलांना बस सेवा मोफत, या सारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. जर आपल्याला भविष्यामधे हे सगळे सुविधा पाहिजेत असेल तर महाराष्ट्र मधे आपल्याला येत्या निवडणुकीला आम आदमी पार्टी लाच निवडावे लागेल. या नंतर अल्पोहाराचा कार्यक्रम सुरू करण्यात आले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मुलांन सोबत वाळदिवस मनवून आनंद व्यक्त केला. यावेळी आम आदमी पार्टी वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, अशिषभाऊ तांडेकर, सरताज शेख, विनीत निमसरकार, राजकुमार चट्टे, रितेश नगराळे, डोराई स्वामी व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

