परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सर्वोच्च न्यायालयाच्या वर्गीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा आणि क्रिमीलेयर लावण्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला असून या बंदमध्ये परळी शहर व तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे..

