
कळंबा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अंबाई हॉल, कळंबा येथे दि 18/8/2024 रोजी करवीर पो. ठाणे हद्दीतील कळंबा बीट कार्यक्षेत्रातील गावातील,उपनगरीय भागातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्त अध्यक्ष, शांतता कमिटी,गणेश मंडळांचे पदाधिकारी,अध्यक्ष, कार्यकर्ते व पोलीस पाटील, पोलीस मित्र, स्वयंसेवक, साऊंड सिस्टिम, डिझजिटल, प्रिंटिंग प्रेस, चालक- मालक,यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. तरी सर्व मंडाळाचा प्रतिसाद चांगला मिळाला.
करविर पोलीस ठाणे कोल्हापूर निरीक्षक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गणेश उत्सव मिरवणूक शांततेत पार पाडावी व पारंपारिक पध्दतीने गणेश उत्सव मिरवणूक साजरी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे कोल्हापूर करविर पोलीस ठाणे सो निरीक्षक अधीक्षक अधिकारी तसेच करविर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे सुहास पोवार कंळबा गावचे पोलीस पाटिल अजित तिवले तसेच कंळबा गावचे सरपंच सुमन गुरव ,व ग्रामसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई पोवार कळंबा गावचे मित्र मंडळ या सर्वांची उपस्थिती लाभली














