prabodhini news logo
Home चंद्रपूर तुकूम प्रभागातील DOC रोडच्या खड्ड्यांमुळे होतो नागरिकांना त्रस्त

तुकूम प्रभागातील DOC रोडच्या खड्ड्यांमुळे होतो नागरिकांना त्रस्त

0
373

DOC रोडचे काम तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी – आप महानगर अध्यक्ष योगेश गोखरे

DOC रोडचे काम नझाल्यास आंदोलन करू…

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर: तुकूम प्रभागातील DOC रोड, ST वर्कशॉप चौक ते अयप्पा मंदिर कळे जाणाऱ्या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे रहदारीची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. या मार्गावर BJM कारमेल अकॅडमी स्कूल, जैन मंदिर, आणि विहार यासारखी महत्त्वाची ठिकाणे असल्याने येथे अनेक विद्यार्थी, श्रद्धाळू आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते.

या परिस्थितीबद्दल जनतेच्या वतीने आज आम आदमी पार्टी, चंद्रपूर तर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले. निवेदनात या रोडवरील खड्डे तातडीने बुजवून दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल आणि दुर्घटना टाळल्या जातील.

यासंदर्भात आम आदमी पार्टीचे महानगर अध्यक्ष योगेश गोखरे म्हणाले, “तुकूम प्रभागातील DOC रोडवर खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास गंभीर आहे. विशेषत: शाळेतील मुलं, वयोवृद्ध आणि वाहतुकीसाठी हा मार्ग वापरणाऱ्या प्रत्येकासाठी हा रस्ता धोकादायक ठरला आहे. महानगरपालिकेने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. आम आदमी पार्टी जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर कुठल्याही प्रकारे तडजोड होऊ देणार नाही.”

आम आदमी पार्टीने नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन, योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, या विषयावर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर चे अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष माजी सैनिक सुनील सदभैय्या, जितेंद्र भाटिया, नाजमा बेग, करुणा यलचलवार , कविता शाश्त्रकार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here