भिम आर्मी भारत एकता मिशनचा भारत बंदला शांतता पूर्वक सहभाग नोंदवला

0
166

लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी – Sc /St आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय हा संविधान विरोधी विभागीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी संपूर्ण भारत बंद आंदोलनामध्ये भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग यांच्या आदेशाने भिम आर्मी पदाधीकारी यांनी भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता

छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्राचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष बलराज भाई दाभाडे आणी जिल्हाप्रमुख बाळू वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजी नगर मध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला होता यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

लातूर
महाराष्ट्र माजी संघटक अक्षयजी धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोदजी कोल्हे, जिल्हाप्रमुख विलास अण्णा चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता जिल्हाधिकारी मॅडम यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले निवेदन देण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

जालना
मराठवाडा कार्याध्यक्ष एडवोकेट सुभाषजी सरवदे आणि जिल्हाप्रमुख सुभाष भाऊ दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा बंद करण्यात आला होता यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

हिंगोली
जिल्हाप्रमुख महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहर बंद करण्यात आलं होतं यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नंतर पोलिसांनी जिल्हाप्रमुख महेंद्र गायकवाड यांना नजरकैद केले होते काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.

बीड
जिल्हाप्रमुख सिद्धार्थ मायांदळे आणि वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष बाबा मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा बंद करण्यात आला होता पदाधिकारी उपस्थित होते.

धाराशिव
मराठवाडा उपाध्यक्ष उत्तरेश्वर भाऊ जाधव आणी जिल्हाप्रमुख अविनाश भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव (उस्मानाबाद) शहर बंद करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

नांदेड
किरणजी सदावर्ते आणी स्वप्निल जी भोसीकर जिल्हाप्रमुख (दक्षिण उत्तर) यांच्या उपस्थितीमध्ये नांदेड शहर बंद करण्यात आले होते तसेच नांदेड जिल्ह्यातील काही तालुके येथेतील तालुकाप्रमुख आणि जिल्हा टीमने बंद करण्यात आले होते.
मराठवाड्यात सर्वत्र शांततेमध्ये बंद पाळण्यात आला होता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here