प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
रेणुताई पोवार कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी – पत्रकारांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत पोलिसांना कडक सुचना देण्यात येईल. पत्रकार हा कानाकोपऱ्यातून माहिती देत असतो पत्रकार मुळे समाजामध्ये काय काय घडत असतं ते घरोघरी गावोगावी समाजामध्ये समजत असते त्यामुळे पत्रकार हा लेखीनीचा दौलत आहे.
त्यामुळे पत्रकारांची आयडेंटी कार्ड हि त्यांची पोचपावती आहे म्हणून पत्रकारांचे आयडेटि कार्ड हिच त्यांची ओळख असून त्याची अडवुन केली जाणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी आपल्या व्यक्तयामधे बोलले. यासर्व गोष्टी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भेट घेऊन बुधवारचा प्रकार कानावर घातला तसेच पॅरिस ऑलिंपिकमधे पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्नील कुसाळे यांच्या रॅली मध्ये महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन केले मिरवणुक मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्याने पत्रकारातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री आज दौऱ्यावर असताना कोल्हापूर प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने त्याची भेट घेतली तेथे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेची ताकत वाढवली पत्रकारांशी पोलिस प्रशासना कडुन झालेल्या घटनेबाबत गृहमंत्री म्हणून माफी मागून अशा कोणाही अधिकाऱ्याला पाठिशी घालणार नसल्याचे फडणीस यांनी स्पष्ट केले. गैरप्रकार करण्याऱ्या ना कारवाई करु असे सांगितले.
यापुढे पत्रकारांना कोणताही त्रास पोलिसांच्याकडून होणार नाही याबाबत पोलिसांना कडक सुचना देण्यात येईल. अन्य एका कर्मचाऱ्याने महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन केले प्रसारमाध्यमांना जाणीवपूर्वक पोलीसांकडून टार्गेट करण्यात येत असल्याने पत्रकारांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणीस आणि पवार यांची कोल्हापूर क्लबच्या शिष्टमंडळाने भेट घेतली पत्रकारांना पोलीसा कडुन प्रत्येक वेळी होत असलेली अडवुनक वाढतच आहे.. त्यामुळे अध्यक्ष शितल धनवडे व अन्य पत्रकारांनी लक्षवेधले यांचे सरकारने गार्भीयाने दखल घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.
पत्रकारांशी पोलिस प्रशासनाकडून झालेल्या घटनेबाबत गृहमंत्री म्हणून जाहीर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणीस यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची उपस्थिती लाभली. पत्रकारांना मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री, पालकमंत्री खासदार, जिल्हाधिकारी या सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळाला.

