एकादिवसात तुम्हाला नोट बंदी करता येते एकादिवसात लॉकडाऊन करता येते मग महिला व मुलीवर बलात्कार,विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एका दिवसात शिक्षा का करता येत नाही – अक्षय धावारे भीम आर्मी
लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी – बदलापुरात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला तरी सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही बदलापूर सह महाराष्ट्रात आनेक ठिकाणी बलात्काराचे ,व विनयभंगाचे प्रकार घडत आहेत या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले ,या गुन्ह्यातील गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी, फाशी देण्यात यावी म्हणून , पिडितेचे आईवडील नातेवइकांसह समजतील नागरिक हे संविधानिक पद्धतीने न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरून आरोपींना फाशी द्या ही मागणी करत असताना मागणी करणाऱ्यावर लाठीचार्ज करून गुन्हे दाखल करत असेल ,तर ह्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? हा प्रश्न पडला आहे . पोलिसाला सामोरे करून समजातील पिडित लोकांवर दबाव टाकत असताना दिसत आहे. एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव चा हा नारा कितपत खरा ठरेल यालाच लाडकी बहिण म्हणायचं का? चोर सोडून संन्याशाला फाशी देणार हे सरकार दिसतय .म्हणून सर्व प्रथम या सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो न्याय माण्यासाठी आंदोलनात सहभाग होऊन न्यायच्या अपेक्षेने आंदोलने करणाऱ्या नागरिकांवरील गुन्हे ताबडतोब माघे घ्या सर्व प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा द्या अन्यथा राज्यभर या ही पेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशन चे राज्य संघटक अक्षय धावारे यांनी दिला.


Nice