राकॉ मध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला मिळणार सन्मान:मंत्री डॉ.धर्मरावबाबा आत्राम

0
50

दुर्गम भागातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

तिरुमलेश कंबलवार अहेरी प्रतिनिधी – अहेरी – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अतिदुर्गम भागातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मान मिळेल असा विश्वास दिला.

डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्री पद स्वीकारताच केवळ अहेरी विधानसभा नव्हेतर गडचिरोली जिल्हयाचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.रोजगार,शिक्षण आणि सिंचन हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आवश्यक निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असल्यावरही त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवली आहे.दिल्लीत असो की गल्लीत प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याशी थेट संवाद साधतो.त्याचेच फलित म्हणून विविध पक्षातील कार्यकर्ते आजही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुळत आहेत.

खेड्यापाड्यातील प्रत्येक कार्यकर्ता अहेरीला येऊन आपल्याला भेटू शकत नाही.त्यामुळे आपल्यावर जिव्हापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते प्रत्यक्ष विविध गावांत सभा घेऊन जनसंवाद साधत आहेत. वयाच्या सत्तरी गाठलेल्या नेत्यांमध्ये असलेला नेतृत्व, तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि प्रत्येक समाजाच्या विकास करण्याची धडपड यामुळे वयोवृद्धासह तरुण वर्ग देखील त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.

याचाच एक भाग म्हणून कमलापूर परिसरातील तोंडेर, चीटवेली, चिंतारेव गावातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आज अहेरी येथील राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या पक्षाच्या दुपट्टा गळ्यात टाकत, पुष्पगुच्छ देत त्यांचा स्वागत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here