
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम : महाराष्ट्र शासनाने शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजने प्रमाणे दिव्यांगा करीता योजना सुरु करून,निराश्रीत व बेघर असलेल्या दिव्यांग आणि निराधारांना आवश्यक साधन सामुग्री घेण्याकरीता आर्थिक सहकार्य कमितकमी दहा हजार रुपये देवून मदतीचा हात द्यावा. तसेच बेघर दिव्यांग निराधार व्यक्तींना नगर पालिका, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रात भूखंडासह घरकुलं बांधून द्यावीत.अशी मागणी महाराष्ट्र अपंग संस्था कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय मधुकरराव कडोळे यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष बच्चु कडू, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका पत्रान्वये केलेली असून,तमाम महाराष्ट्रातील राजकिय नेते,मंत्री, खासदार,आमदार,जिल्हा परिषद व नगर परिषद सदस्यांनी दिव्यांगा करीता ही मागणी त्यांच्या स्तरावरून शासनाकडे लावून धरावी.आणि जिल्हा परिषद,नगर परिषद,ग्रामपंचायत यांनी तसेच विविध सेवाभावी दिव्यांग संस्थानी आपल्या संस्थेचे ठराव घेऊन शासनाकडे दिव्यांग व निराधाराच्या कल्याणाकरीता पाठवावेत.असे आवाहन केले आहे.














