आरमोरी विधानसभा जिंकण्याठीच लढण्याचा निश्चय
देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – देसाईगंज – वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आरमोरी विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा देसाईगंज येथिल सिंधू भवनात नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचितचे विदर्भ समन्वयक कुशल मेश्राम, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम होते, तर स्वागताध्यक्ष जिल्हा संगठक भिमराव शेंडे होते. जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी.के. बारसिंगे, उपाध्यक्ष विलास केळझरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, जिल्हा संगठक जगन बंसोड, कोरची तालुकाध्यक्ष सुधाराम सहारे, कुरखेडा तालुकाध्यक्ष ताराचंद नंदेश्वर, वडसा तालुका महासचिव प्रविण रामटेके, लिना रामटेेके, कपूरदास दुपारे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना कुशल मेश्राम म्हणाले की, एससी,एसटीच्या आरक्षणात वर्गिकरण व क्रिमीलेयरच्या संदर्भाने जो सुर्पिम कोर्टाचा निर्णय आला त्याचा विरोध करण्यासाठी ज्यांनी लोकसभा निवडणूकीत संविधान व लोकशाही वाचविण्याच्या भूलथापा दिल्या त्या महाविकास आघाडीतील कोणतेेच पक्ष एकविस तारखेच्या भारत बंदमध्ये रस्त्यावर येऊन सहभागी झाले नाहीत यावरून एससी, एसटीच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे की, आपल्या हक्क व अधिकाराचे खरे मारेकरी कोण आहेत? म्हणून महाविकास आघाडी व महायुतीच्या खोट्या नेरेटीव्हला बळी न पडता जो पक्ष व नेता आपल्या हक्क अधिकारासाठी लढा देत आहे त्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या बाजूने मतदान करून आपले आरक्षण वाचविले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी देखील मनोगत व्यक्त करतांना येणा-या विधानसभा निवडणूकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून वंचितचा आमदार निवडून आणण्याचा निश्चय केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष भिमराव शेंडे यांनी तर संचालन प्रा अशोक मेश्राम यांनी तर आभार उमाकांत बंसोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवदास बंसोड, शिवाजी मेश्राम, लक्ष्मण नागदेवते, नानाजी क-हाडे, अभिमन्यु बंसोड , आशिष घुटके, भास्कर मेश्राम आदिंनी अथक परिश्रम केले.
या कार्यक्रमाला कोरची, कुरखेडा, आरमोरी व वडसा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

