रेणूताई पोवार जिल्हा प्रतिनिधी कोल्हापूर – अर्लियन कवियों का अध्यात्म प्राइवेट लिमिटेड कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहिणी अमोल पराडकर यांनी गोवा म्हापसा येथील साईबाबा मंदिर, महिला आश्रम, बालिकाश्रम येथे उपक्रम घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. साईबाबा मंदिर येथे कवी कट्टा व भोजनाची व्यवस्था कविता शेट्ये व त्याचे पती चंद्रशेखर शेट्ये यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी देवळाचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान कमिटीचे मनःपूर्वक आभार मानते. कवी कट्टा मध्ये निमंत्रित कवींनी श्रावण मासी हर्ष मानसी ह्या थीमवर सुंदर कविता सादर करण्यात आले.
सर्व कवींना रोहिणी अमोल पराडकर यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्या अशा भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती दिनकर ताईंनी केले.
बालिकाश्रम मध्ये सर्वांना प्रांजली यांनी रांगोळी काढायला शिकवले.
महिला आश्रम मध्ये महिलांशी हितगुज व विविध कला गुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम केलेत. एकपात्री प्रयोग दीपक सरांनी करून कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. नंतर रेखा ताईंनी मला आयोजक म्हणून संस्थेची माहिती देणारी पुस्तके भेट दिली.

