prabodhini news logo
Home चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी अंकित वाघमारे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी अंकित वाघमारे यांची निवड

0
153

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर- चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार विभागाच्या चंद्रपूर तालुक्याच्या आज काही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असुन कामगार क्ष्रेत्रात मागील अनेक वर्ष्यांपासूनचा अनुभव असलेल्या पदाधिकाऱ्यांवर जवाबदारी दिल्याने निश्चितच कामगारांना फायदा होईल असा विश्वास कामगारांनी व्यक्त केला.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कामगार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते अंकित वाघमारे यांची निवड करण्यात आली. व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय सेजूळ यांनी अंकित वाघमारे यांची चंद्रपूर तालुकाध्यक्ष पदी तर राजा खान यांची चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असुन या जिल्ह्यात सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असुन उद्योग व कंत्राटदारांद्वारे कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडल्यास कामगारावर कामावरून काढण्याची कारवाई करण्यात येत असल्याने सर्वत्र कामगार अन्याय सहन करीत मूकपणे काम करतात. या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार संघटनेतर्फे करण्यात येणारं असुन कामगारांनी या संघटनेशी संपर्क करुन सहभागी व्हावे असे आव्हाहन यावेळी जिल्हाध्यक्ष सेजूळ यांच्यातर्फे करण्यात आले.

अंकित प्रकाश वाघमारे यांची तालुकाध्यक्ष तर राजा अब्दुल सत्तार शेख यांची तालुका उपाध्यक्ष पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सेजूळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पियुष चांदेकर, उर्जानगर ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष धीरज दुर्योधन, मनीष मंगाम,आशिष टक्कर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here