
सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – भैरवनगर येथील चक्रवर्ती सम्राट अशोक संघाच्या वतीने आयोजित व्याख्यान मालिकेतील सलग बाराव्या वर्षातील पाचवे पुष्प पाली भाषेचे अभ्यासक, विचारवंत तथा धम्म प्रवचनकार सन्माननीय मिलिंद माचले यांनी गुंफले बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथांमध्ये बाबासाहेबांनी वाचकांसाठी उपस्थित केलेले प्रश्न या विषयावर व्याख्यान सादर करत असताना बौद्ध साहित्यातील अनेक धर्मग्रंथांचा संदर्भ देऊन विषयाच्या अनुषंगाने सखोल व अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य सन्माननीय डी. बी. भोसले हे होते.
याप्रसंगी स्वरा बोरकर व तन्वी घोडेस्वार या बाल उपासिकांनी आपले विचार व्यक्त केले तर सन्माननीय अमित चौरे यांनी संत कबीराचे दोहे यासंदर्भाने आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व उपस्थितांना अल्पोपहार संघाचे उपासक सन्माननीय अरुणजी गोतारणे यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत कांबळे यांनी केले. तर आभार संदीप वानखेडे यांनी मानले.














