साहित्यिका, लावणीकारा मा. सरोज गाजरे, भाईंदर यांना प्रजासत्ताक अमृत महोत्सवानिमित्त “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान

0
62

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – वर्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलावडे, आम्ही मुंबईकर सा. वृत्तपत्राचे संपादक प्रमोद सुर्यवंशी, काव्यसंस्था पुणे यांचे संपादक योगेश हरणे यांच्या सौजन्याने विख्यात कवयित्री, साहित्यिका, लावणीकारा सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे मुळ गाव जळगाव खानदेश यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन “जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव” हा पुरस्कार प्रदान करून गौरवान्कित केले गेले. मुंबई, बांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह, स्वामी विवेकानंद रोड येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी विख्यात साहित्यिक व पत्रकार बाळासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला उद्घाटक डॉ. ख. र. माळवे- उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला संस्कृती महोत्सव समिती, स्वागताध्यक्ष मा. प्रा. नागेश हुलावळे, पद्मश्री शास्रज्ञ डॉ. यादव, नासा शास्रज्ञ डॉ डेरिक एंजल्स, ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रहार चे संपादक मा. सुकृत खांडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here