या झोपडीत सुद्धा माणूस राहतो कवी प्रकाश बनसोड यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

0
122

आर्वी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आर्वी- येथील शिक्षक कवी प्रकाश बनसोड यांनी रचलेल्या ‘या झोपडीत सुद्धा माणूस राहतो ‘ या गजलसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरोविण्यात आले. डोणगाव जि. बुलढाणा येथे झालेल्या मानवसेवा बहुउद्देशिय संस्था डोणगांव यांच्या वतीने दिला जाणारा राजाराम धोंडूजी खोडके राज्यस्तरीय स्मृती काव्य पुरस्कार प्रसिद्ध गझलकार डॉ .गणेश गायकवाड, चित्रकार श्रीधर अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पळसकर, प्राचार्य जीवन सिंह दिनोरे, जि.प. सदस्य राजेन्द्र पळसकर, कवी सुनिल खोडके, कवी लेखक रविन्द्र साळवे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘या झोपडीत सुद्धा माणूस राहतो’ या गझलसंग्रहाची निवड संपूर्ण राज्यातून आलेल्या कविता संग्रहामधून करण्यात आली. शाल, सुमने, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
गजलकार कवी प्रकाश बनसोड हे आपला शिक्षकी पेशा सांभाळून आपली साहित्य कला जोपासतात. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आर्वीचे ते मुख्य समन्वयक असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. या आधी त्यांच्या ‘माणूस ‘ व ‘या झोपडीत सुद्धा माणूस राहतो ‘ या काव्यसंग्रहास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.

पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे प्रशांत ढोले, सुनिल खोडके, रत्ना मनवरे, सुरेश भिवगडे, विद्यानंद हाडके, चंदू गाडगे, संजय ओरके, भूषण रामटेके, प्रकाश जिंदे, पद्माकर अंबादे, इत्यादी साहित्यिक व शिक्षक मित्रांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here