जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – “मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर वरखेडा विद्यालयात आज कृष्ण जन्माअष्टमी निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सुनील पाटील, वरिष्ठ लिपिक कैलास उगले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर विद्यालयातील संपत्ती जाधव,कांचन भगरे या विद्यार्थींनींनी आपल्या भाषणातून कार्य सांगितले. विद्यालयाच्या उपशिक्षिका पायल उफाडे यांनी भगवान श्रीकृष्णाचे धार्मिक विचार प्रत्येकाने घेतले पाहिजे असे आपल्या मनोगतात सांगितले.दहीहंडीचा महोत्सव सम्पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी सांगितले.
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजीव पठाडे यांनी भगवान श्रीकृष्णाची गाणी मनोभावे गायली.शेवटी विद्यार्थ्यांनी दहीहंडीसाठी एकावर एक थर रचून श्रीकृष्णाच्या वेशभूषेत अथर्व उफाडे याने दहीहंडी फोडली.यानिमिताने श्रीकृष्ण आणि राधा यांच्या वेशभूषेत अनेक मुलेमुली येऊन ते आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरले.विद्यालयाच्या चित्रकला शिक्षिका भोर मॅडम यांनी फलक लेखन सुंदर रित्या केले.
कार्यक्रमाचे नियोजन 8 वी ब च्या वर्गशिक्षिका पायल उफाडे यांच्या मार्गदर्शनाने उत्तम रित्या केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गायकवाड,दिपीका धुळे यांनी संयुक्तपणे केले तर आभार पायल कापसे हिने मानले.

