छत्रपती शिवाजी महाराज यांचा निकृष्ट पुतळा बनविनाऱ्यांवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करा

0
104

चंद्रपूर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मागणी

महायुतीचे काळे कारणामे काळे फुगे दाखवीत नोंदवला निषेध

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग राजकोट येथे आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला या घटनेच्या निषेधार्थ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गिरणार चौकात जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या नेतृत्वात महायुती भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे.असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब या घटनेचा निषेध व्यक्त केला .

महायुती सरकारचे काळे कारणामेच्या निषेधार्थ काळे फुगे दाखवीत महायुतीचे कारणामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मूलभूत प्रश्नांना नाकारून केवळ सत्ताकारनात रमलेल्या भ्रष्टाचारी सरकारला जागे करण्यासाठीं राज्यात बळीराजाला दिल्या जाणाऱ्या यातना वाढत्या महागाई मुळे प्रत्येक कुटुंबाचं कोलमडलेलं आर्थिक नियोजन महाराष्ट्र अस्मितेवर घाव, वाढते गुंडगिरी-गुन्हेगारी, वाढते महिला वरील अत्याचार ,वाढता भ्रष्टाचार ,पेपर फुटी मुळे ढासळलेल्या शैक्षणिक अवस्थेत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान
महायुतीच्या या महाराष्ट्र द्वेषी धोरणाला कायमचा लगाम लावण्यासाठी महायुतीचे काळे कारणाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात आले
या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र 8 महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा पडतोच कसा
या पुतळ्याचे बांधकाम करताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही त्यामुळे गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन शिल्पकार आपटे, कंत्राटदार चेतन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुण त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीचे आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुते सेवादल जिल्हाध्यक्ष माणिक लोणकर. शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्हारप शहर उपाध्यक्ष राहूल देवतळे, परब गिरडकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पूजाताई शेरकी माजी.जिल्हा परिषद सदस्य वंदना आवडे, जिल्हा सचिव शोभाताई घरडे नीलिमाता यात्राम, नीलिमा नरवडे ,प्रमोद देशमुख नगरसेवक विनोद लाभाने मारुती झाडे सिहल नगराळे, सतीश मांडवकर, नीलकंठ येणे सुवास पिंगे ,सुजल आंबटकर लता जांभुळकर हर्षा कैरकर इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here