उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – उल्हासनगर: “स्वातंत्र्याचा उपभोग नक्कीच घ्यावा पण स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि गैरवापर करता कामा नये.” असे मत साहित्यिका योगिता पाखले यांनी व्यक्त केले.
पुढे कलेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की ” भाकरी तुम्हाला जगवते तर जीवन कसे जगावे हे कला शिकवते”असे विचार प्रकट केले. अनेक उदाहरणे, दाखले व छोट्या बोधकथांच्या माध्यमातून त्यांनी यशाचं व आनंदी जीवनाचे गमक सांगितले. विद्यार्थ्यांशी त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला .
लाडशाखीय वाणी समाज सेवा मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली . त्याच बरोबरच नवविवाहित दाम्पत्यांचा स्वागत समारंभ आणि जेष्ठांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शन करून कार्यक्रमात रंगात आणली . एकटा महिला मंडळाने नारी या विषयावर प्रबोधनात्मक भारुड सादर करून कार्यक्रमाला चार चांद लावले.
या प्रसंगी व्यासपीठावर अवनी एटरप्राइजेस व स्वामी विवेकानंद सेवा मंडळ डोंबिवलीचे मा. अजित कुडे, श्री. हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉ. मुकुल वाणी, उल्हासनगर वाणी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत वाणी ,एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा मा. अदिती बाविस्कर उपस्थित होते.
या कार्यक्र यशस्वी करण्यासाठी लाडशाखीय वाणी मंडळ तसेच एकता महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे यथोचित प्रास्ताविक लाडशाखीय वाणी मंडळाचे सचिव मा. मनोज शेंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रणाली शेंडे, शुभांगी अमृतकर,रेखा येवले, श्वेता मार्कंडे यांनी केले.

