
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – मुंबई : महाराष्ट्र राज्य आयोजित प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती यांच्याकडून सुप्रसिद्ध निवेदिका,साहित्यिका योगिता पाखले याना उत्कृष्ट निवेदिका या पुरस्काराने जेष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब तोरस्कर आणि इतर मान्यवरच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम नॅशनल लायब्ररी सभागृह वांद्रे येथे संपन्न झाला.
या वेळी व्यासपीठावर जेष्ठ साहित्यीक बाळासाहेब तोरस्कर, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती चे उपाध्यक्ष डॉ. ख. र. माळवे, स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन आयोजक प्रा. नागेश हुलवळे ,पद्मश्री विजेते, राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार अध्यक्ष डॉ. जी. डी. यादव, नासा शास्रज्ञ डॉ. डेरीक एंजलस, संपादक दैनिक प्रहार डॉ सुकृत खांडेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईकर साप्ताहिकाचे संपादक प्रमोद सूर्यवंशी, बी.पी.ई. हायस्कुल बांद्रा चे मुख्याध्यापक भानुदास केसरे,रमेश पाटील,योगेश हरणे यांनी मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे पहिल्या सत्राचे सुंदररित्या सुत्रसंचलन कवयित्री योगीता पाखले यांनी केले आणि मान्यवर, रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.














