
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्रातील बहुश्रुत गायिका श्रुती पटवर्धन आणि उत्कृष्ट निवेदिका/ कवयित्री पल्लवी वढवेकर बर्वे रसिक प्रेक्षकांसाठी नव्या कोऱ्या पावसावरील गीतांची व कवितांची मैफिल घेऊन येत आहेत “ तानापिहिनिपाजा… रंग पावसाचे”
गंधारधून प्रायोगिक मंच प्रस्तुत पावसावरील कविता, गझल, गाणी व नृत्याविष्कार अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून सादर केल्या जाणाऱ्या या मैफिलीची गोष्ट तशी थोडी वेगळीच आहे. गंधारधून या नावाप्रमाणेच स्वर आलापातील गंध, माधुर्य आणि गाण्यांची धून त्यांच्या सादरीकरणाद्वारे आपणास ऐकायला मिळते. आशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची रूपरेखा पाहण्याची मजा काही औरच आहे.
शनिवार दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे येथील सहयोग मंदीर, घंटाळी या सभागृहात रात्री ६ ते ८.३० या सुनिश्चित वेळेत अशा देखण्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आजच आपली जागा या बहारदार कार्यक्रमासाठी राखून ठेवा.
गंधारधूनच्या या कार्यक्रमात मान्यवरांमध्ये प्रदीप बडदे (कवी, लेखक, पत्रकार, निवेदक), दिशा देसाई (कथ्थक अलंकार) अनुराधा आंबोळे (गायिका), राज्ञीषा कुलकर्णी (कवयित्री) अशा काही बहुचर्चित पाहुण्यांच्या स्वरचित कविता, गझल व गाणी त्यांच्या स्वरमयी आवाजात ऐकण्यासाठी ही एक उत्तम पर्वणी आहे. निश्चितपणे हा कार्यक्रम बहारदार होणारच आहे त्यासाठी आपणा सर्वांनी पुरेपूर साथ द्यावी अशी रसिक प्रेक्षकांना आदराची विनवणी.
बुकिंग आणि प्रयोगासाठी संपर्क
मो. 9004293081














