prabodhini news logo
Home चंद्रपूर यंग थिंकर्स फाऊंडेशन व स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान द्वारा “लक्ष्यवेध २०२४” कार्यक्रम उत्साहात...

यंग थिंकर्स फाऊंडेशन व स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान द्वारा “लक्ष्यवेध २०२४” कार्यक्रम उत्साहात संपन्न.

0
212

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यंग थिंकर्स फाऊंडेशन व स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर द्वारा ३५१ व्या शिवराज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन “लक्ष्यवेध-२०२४” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमा मध्ये विशेष कार्यक्रमात जाणता राजा लघुनाट्य सादर करण्यात आले, नाट्य च्या माध्यमातुन छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला. तसेच फाऊंडेशन तर्फे आयोजित विविध स्पर्धांचा पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले सोबतच विवीध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा घेऊन “लक्ष्यवेध-२०२४” कार्यक्रम उत्साहात पार पडला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.किशोर जोरगेवार उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. रमेश भुते, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष मा.ब्रिजभुषण पाझारे, चर्मरोग तज्ञ डॉ. स्नेहल पोटदुखे, पोलीस सब-इन्स्पेक्टर मा. रोशन इरपाचे, सायबर विभागातून मा. मुजावार अली, मा. आशिष माशीरकर उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन चे पी.एस.आय सोनाली आगलावे मॅडम यांनी उपस्थिति दर्शवली व अल्पवहिन मुली व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत विद्यार्थीनी व महिलांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती ॲड. सारिका संदुरकर, व भाजपा महानगर चंद्रपूर सचिव मा. उमेश आष्टनकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यंग थिंकर्स फाऊंडेशन चे अध्यक्ष व स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान विदर्भ प्रमुख निशिकांत आष्टनकर यांनी केले व नागरिकांना फाऊंडेशन च्या कार्याबद्दल माहिती दिली, तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ठ संचालन प्रा. विशाखा सरणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपेक्षा भालेराव यांनी सर्व पाहुण्यांचे व विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांचे आभार मानले. यावेळी फाऊंडेशन चे उपाध्यक्ष अनिकेत वांढरे, जिल्हायुवती प्रमुख ऋतुजा जमदाडे, तालुका प्रमुख रोशन आस्टूनकर, सचिव सुनयना रोहनकर, व्यवस्था प्रमुख श्रवण राचरलावार, प्रगती वाभिटकर, कलामंच प्रमुख निकिता चहारे, कोषप्रमुख अभिषेक गुज्जनवार व सदस्य अंकीता चहारे, मिनल चिकनकर, रेवती कुलसंघे, रिशिकेश नागापुरे, नंदीनी नरनावरे, कृतीका बोबडे, डॉली मीलमीले, धनीष्ठा शेंडे, रुचिता घडुले, सौरभ आखाडे, वैष्णवी मत्ते, केतन इजगीरवार, मनोज बोथले, रत्नाकर मेश्राम, तुषार वनकर व इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here