prabodhini news logo
Home ठळक बातम्या बोपोडी येथे विद्यार्थिनींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन शिबिर संपन्न

बोपोडी येथे विद्यार्थिनींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन शिबिर संपन्न

0
165

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वनवर्धिनी फाउंडेशन,पुणे मनपा समाज विकास विभाग आणि फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन “मुस्कान”यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला बोपोडी येथील सभागृहात विद्यार्थिनींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलींमध्ये जागृती व सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अंकिता विजय ढोणे व सहकारी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.स.रा.प्रशाला आणि उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून MSEB बोपोडी विभागाच्या सहाय्यक अभियंता नम्रता देशमुख,पुणे मनपा समाज विकास विभागाचे समाजसेवक संदीप कांबळे,गौरी
कासार,खडकी पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पोलिस खाडे मॅडम,डॉ.स.रा.प्रशालेचे प्र. मुख्याध्यापक जीवन कांबळे,उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्दार्थ ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वनवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ढोणे,पदाधिकारी अविनाश कदम,संतोष खरात,अमोल ओव्हाळ,त्रिरत्न साळुंके,माधुरी गायकवाड, स्नेहल ओव्हाळ, अस्मिता ढोणे,भारती कांबळे, प्रतीक्षा शेळके,अर्चना साळुंके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे निवेदन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here