सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – पुणे: शहरात वाढत्या महिला अत्याचार विरोधात फकीरा ब्रिगेडसंघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलनाच्यामाध्यमातून आवाज उठवण्यात आला. अपराध्यांना भरचौकातफाशीची शिक्षा देणे व महिलांना सुरक्षा मिळावी अशी संघटनेच्यावतीने यावेळी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्ते व महिला गटयांनी घोषणा देऊन महिलांवर होणार्या अत्याचार विरोधात निषेधव्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग सदबदे यांनी आपते मत व्यक्तकरताना सांगितले की आज संपूर्ण भारत देशात अनेक ठिकाणीमहिलांचा बलात्कार व निघृण हत्या केली जात आहे परंतु प्रशासनयाकडे दुर्लक्ष करीत आहे. अपराध्याला फाशीची शिक्षा ही झालीपाहिजे आणि जर प्रशासन यावर गप्प असेल तर जनता स्वतः त्यांना शिक्षा करेल. त्यांनी आपत्या मागण्या मांडताना म्हटले की याविषयावर सक्त कायद्या लागु करण्यात यावा. यावेळी संघटनेचे पुणेजिल्हा महिला प्रमुख उषा भोसले, उमरगा महिला प्रमुख, नागिणीथोरात, संघटक न संघटनेच्या महिला गट उपस्थित होत्या.

