शारदा भुयार महिला जिल्हा प्रतिनिधी वाशिम- कारंजा (लाड) : भाजपा प्रदेश पदाधिकारी तथा वाशिम यवतमाळ लोकसभा भाजपा समन्वयक असलेले राजु पाटील राजे यांनी गुरुवार दि. 29 ऑगष्ट रोजी,आसाम मधील गोहाटीच्या मातृशक्ती पिठाशी साम्य असणाऱ्या भारतामधील एकमेव आणि ऐतिहासिक व प्राचिन असलेल्या श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाला भेट देवून दर्शन घेतले. तसेच श्री कामाक्षा देवी संस्थानची माहिती जाणून घेतली.यावेळी श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजाचे अध्यक्ष हभप दिगंबरपंत महाजन तथा पुजारी रोहीत महाजन उपस्थित होते. याप्रसंगी श्री कामाक्षा देवी संस्थानच्या वतीने, देवीचे गोंधळी तथा आदर्श समाजसेवक संजय कडोळे यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी राजु पाटील राजे यांचा शाल,श्रीफळ,प्रसाद देवून स्वागतपर सत्कार केला.तसेच कारंजा नगरीचे संस्थापक महर्षी करंज ऋषीच्या काळातील हे अतिप्राचिन आणि भक्तांची मनोकामना किंवा इच्छा पूर्ती करणारे एकमे जागृत संस्थान असून साक्षात शक्तीपिठ आहे त्यामुळे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज देखील येथे दर्शनार्थ आल्याची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय बगडे,विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष मंगेश कडेल,भाजपाचे विजय काळे, संदिप काळे,पत्रकार सुधिर देशपांडे,पत्रकार समिर देशपांडे इत्यादी उपस्थित होते.

