कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याचे वतीने सिंदेवाही तहसील कार्यालय येथे रक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही आयोजित केला होता. तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी हे बाहेरील विभागातून आपली जबाबदारी पार पाडत असतात. पण, कामाच्या व्यापामुळे त्यांना रक्षाबंधनाला बहिणीकडे जाता येत नाही.
सिंदेवाही तहसीलदार तसेच नायब तहसिलदार व महसूल विभागांचे ईतर शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टी सिंदेवाही महिला मोर्च्याचे वतीने भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे वतीने दरवर्षी तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बांधवाना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी जिल्हा सचिव नवले, शहर अध्यक्ष हाडगे ,सचिव शहर सचिव नर्मलवार, गहाणे, सिंदेवाही नगरसेविका पुस्तोडे , भरडकर ,डांगे, मेश्राम,आदी भारतीय जनता पार्टी सिंदेवाही पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.

