प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी पुणे- पुणे कात्रज चौक या चौकामध्ये वारंवार ट्राफिक ची समस्या कमी होताना दिसत नाही. अनेक वर्षापासून चाललेले उडणपलाचे काम मंद गतीने चालू आहे. अनेक वेळा पालिका अधिकारी मंत्र्यांनी पाहणी केली परंतु कात्रज, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नरे आंबेगाव, सच्चाई माता परिसर या सर्व भागातील लोकांना या चौकामधून येणं जाणं सुरू असतं परंतु कात्रज चौकातली समस्या वारंवार वाढताना दिसतच आहे. त्यामध्ये अनेक अपघात या चौकामध्ये होत असतात यामध्ये पीएमपीएल बस प्रवासी यांना चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी सकाळच्या वेळात मोकळा रस्ता असताना सुद्धा बस स्टॉप जवळ न लावता रस्त्याच्या मध्यभागी थांबवताना वारंवार दिसत आहे. त्यामुळे होणारे ट्राफिक यामध्ये वाढ होताना दिसते. स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो असता कुठलीही उपयोजना या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून होताना दिसत नाही. नियमाप्रमाणे वाहन चालकाने बस स्टॉप जवळ वाहन थांबवून प्रवाशांना घेणे किंवा उतरवणे अपेक्षित असते परंतु वाहन चालकांना या ठिकाणी कुठलेही ट्रेनिंग मिळत नाही. आम आदमी पार्टीने दर गुरुवारी पुणे शहरांमध्ये बस स्टॉप जवळ पीएमपीएल उपक्रम अनेक वेळा राबवला आहे. त्याला चालकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु चालकांना अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग देण्याची गरज असते. ते मात्र होताना दिसत नाही. तसेच या ठिकाणी रिक्षावाल्यांची मजुरी सुद्धा दिसून येत आहे. आरटीओ, ट्राफिक पोलीस कारवाई करताना दिसत नाही. या ठिकाणी सीट वाहतूक करून घेऊन अवैद्य पद्धतीमध्ये सरस चालू आहे. असे वक्तव्य आम चे शहराध्यक्ष अनुसूचित जाती प्रशांत कांबळे यांनी केले.

