prabodhini news logo
Home कविता आजची कविता – जन्म नको रे पुन्हा !

आजची कविता – जन्म नको रे पुन्हा !

0
108

मानवा काय गरज तुला
दुसऱ्या-तिसऱ्या जन्माची
ह्याच जन्मी कर ना !
कार्य तू सत्कर्माची

जन्मदात्या आई वडिलांना
वृद्धाश्रमात आश्रयाला धाडून
आधीच केला आहे तू गुन्हा
मग कशाला हवाय रे
हा जन्म तुला पुन्हा

कधी कळलीच नाही रे तुला
आई – वडिलांची महत्वकांक्षा
मिळेल का ! हा जन्म पुन्हा
याची कशाला करतेस अपेक्षा

मानव…… जातीला
जन्म एकदाच मिळतो
स्वार्थापायी…… मनुष्य हा
जगी साऱ्यांनाच गिळतो

ह्या एकाच जन्मात तू
केलेत अनेक अन्याय अत्याचार
पुनर्जन्माच्या रूपाने पुन्हा
नकोच व्हायला रे तुझा सत्कार

महिलांवर अत्याचार बलात्कार करून
जिवनात करतो आहेस रे गुन्हा
म्हणूनच अंगुलिमाला म्हणतो
मानवा तुझा जन्म नको रे पुन्हा !

कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे बेंबाळकर
ता. सावली, जिल्हा :- चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here