जिल्हा परिषद अंतर्गत 697 युवा प्रशिक्षणार्थीना नियुक्तीपत्र

0
57


प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-ठाणे कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जात आहे. युवा प्रशिक्षणांतर्गत एकूण भरावयाची पदे 734 असून प्रत्यक्ष नियुक्ती दिलेले प्रशिक्षणार्थी 697 आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथील विविध पदासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिकाऊ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुख यांच्या हस्ते युवा प्रशिक्षणार्थीना नियुक्ती पत्रक देण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी संख्या ३३, पंचायत समिती 270, ग्रामपंचायत 431 असे एकूण भरावयाची पदे 734 आहेत. उरलेल्या युवा प्रशिक्षणार्थी यांचे आदेशाच्या कागद पत्रांची पूर्तता करून नियुक्ती आदेश देण्याचे नियोजन सुरु आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) प्रमोद काळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेव्दारे उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजक व युवकांना महत्वाची ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here